मुलांची सर्जनशीलता आपण अनेकदा अनुभवत असतो. त्यांच्या या सर्जनशीलतेला एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने ‘कुल्फी’तर्फे इयत्ता चौथी ते दहावीच्या मुलांसाठी लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. यात कथा, कविता, अनुभवलेखन, प्रवासवर्णन किंवा व्यंगचित्र यापैकी कोणत्याही एका प्रकारचं लेखन करता येईल. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीच्या वर्गातील सर्व मुलामुलींसाठी खुली आहे. या स्पर्धेत उल्लेखनीय लेखन करणाऱ्या मुलांना छानसं बक्षीस तर मिळणार आहेच, शिवाय त्यातील काही लेखन कुल्फीच्या येत्या वेगवेगळ्या अंकांमधून प्रकाशितही केलं जाईल.

अधिकाधिक मुलांना लिहिण्यासाठी उद्युक्त करून लेखन पाठवावे ही विनंती. लेखन पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे.

लेखन स्पर्धेचे नियम:

1. लेखन पूर्वप्रकाशित नसावे. लेखन अनुवादित नसावे. मुलांनी केलेले लेखन स्वतः लिहिलेली/रचलेली रचना हवी.

2. ही स्पर्धा केवळ इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

3. लेखन मराठीत असावे. मात्र ते प्रमाण मराठीतच असावे असे बंधन नाही.

4. लेखन कागदावर लिहिलेले असल्यास सुवाच्य असावे. सर्व पानांचे फोटो एकत्र करून एकच एकत्रित पीडीएफ फाइल पाठवावी. लेखन टाइप केले असल्यास ते युनिकोडमध्ये असावे.

5. लेखनासोबत विद्यार्थाचे नाव, शाळेचे नाव, शहर/गावाचे नाव, इयत्ता/तुकडी आणि पालकांचा मोबाइल नंबर यांचा उल्लेख अनिवार्य आहे. विद्यार्थी कोणत्याही शाळेत जात नसतील (होम स्कूलिंग करत असतील) तर तसे नमूद करावे.

6. काही शारीरीक कारणांमुळे लिहिणे किंवा टाइप करणे शक्य नसेल तर गोष्ट रेकॉर्ड करून ऑडिओ फाइल पाठवता येईल.

7. शब्दमर्यादा:

>कथा

अ. रहस्यकथा किंवा भयकथा असल्यास लेखन 1000 शब्दांपर्यंत गेले तरी चालेल.

ब. इतर सर्व कथाप्रकारांसाठी जास्तीत जास्त 600 शब्द.

>कविता – शब्दमर्यादा नाही.

>अनुभव लेखन – जास्तीत जास्त 500 शब्द

>प्रवास वर्णन – जास्तीत जास्त 700 शब्द

>व्यंगचित्र – A4 कागदाच्या जास्तीत जास्त दोन बाजू वापरता येतील.

8. कथेच्या शेवटी तात्पर्य नसावे. तांत्रिक/वैज्ञानिक लेखन माहितीपर लेखन, प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्रात्मक लेखन पाठवू नये.

9 लेखन kulfi.atakmatak@gmail.com या पत्त्यावर पाठवावे. लेखन पाठवण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024