लेखन : अमृता गोटखिंडीकर
चित्र : अनुपम ताथवडे
छायाचित्र : अपूर्व पाध्ये, अनुपम ताथवडे
पुस्तकातला लेख वाचला ना? पुस्तकात दिली आहे त्याच्याहून वेगळी एक गंमत ऐका! टेरेनियम मध्ये एक 'भस्म्या'ची टोळी सुद्धा आहे बरं का. हि टोळी आहे मातीतल्या लहान लहान किड्यांची. तुम्ही कधी बागेतली माती नीट मायक्रोस्कोपखाली पाहिली, तर तुम्हाला अगदी लहान पांढऱ्या रंगाचे किडे दिसतील. त्यांना म्हणतात आयसोपोड (isopod). टेरेनियममध्ये एकमेकांवर / एकमेकांच्या आधारे जगणारे कितीतरी घटक आहेत. या साखळीमध्ये हे आयसोपोड फार महत्वाची भूमिका निभावतात. ही टोळी कुजलेले,सडलेले शेवाळे (microfauna ), कुजलेली मुळे वगैरे खाऊन गुजराण करते. यांच्यामुळे काय होते, तर कुजलेल्या सडलेल्या नकोश्या असणाऱ्या घटकांची विल्हेवाट लागते. शिवाय या आयसोपोडच्या विष्ठेमुळे जमिनीचा कस वाढतो. जमीन भुसभुशीत राहते .
या भस्म्या टोळीबरोबर अजून एक 'खादाड' टोळी आहे . ती म्हणजे springtail किडे. हेही चॉकलेटी रंगाचे किडे तुम्हाला बागेतल्या मातीत आढळतील. हे खादाडखाऊ किडे सतत खात असतात. त्यांना आवडते मोड आणि बुरशी. टेरेनियममधल्या बाष्पामुळे बुरशी लागण्याचा संभव या किड्यांमुळे कमी होतो.
अश्या प्रकारे या दोन दोस्तांमुळे ‘टेरेनियम’ स्वच्छ आणि जिवंत राहते. या वरच्या दोन किड्यांचे 'बायो-ऍक्टिव्ह' तुम्हाला एखाद्या बागकामाच्या दुकानात सहज मिळेल.
तर मग करून पाहणार ना, रायासारखं 'टेरेनियम'?
तुला युट्यूबवर अनेक प्रकारे बनवलेली टेरेनियम सापडतील. 'अपूर्व पाध्ये' आणि छापील अंकात चित्र काढली आहेत ते 'अनुपम ताथवडेकर' यांनी वेगवेगळ्या 'टेरेनियम'साठी एक युट्यूब चॅनेल बनवले आहे - 'Terraकृती'. त्याची ही लिंक
अजून काही टेरेनियमची चित्रे पाहू या









