एकूण 54 लेख
<p>बंब म्हणजे पाणी तापवायचं यंत्र."<br />तसा मी हुशार आहे. मला लगेच कळलं "अच्छा म्हणजे गिझर!!" <br />"हो गिझरच पण कोळशावर चालणारा."</p>
<p>हल्लीचं जग हे प्रचंड वेगाने प्रगती करतंय. ही प्रगती गेल्या काही दशकांत तर इतक्या वेगाने झाली की अनेक पूर्वापार वापरण्यात आलेल्या वस्तू हा हा म्हणता नाहीश्या व्हायला लागल्या. मला लहानपणापासून अनेक पुस्तके वाचायची सवय आहे. पुस्तकांमध्ये उल्लेख येणार्‍या वस्तूंपैकी बर्‍याचशा वस्तू कधी ना कधी पाहण्यात अथवा ऐकण्यात आल्या असत. परंतु आता तुम्ही तीच पुस्तकं वाचायला घेतली तर तुम्हाला अनेक शब्द अडतील किंवा त्या गोष्टींत येणाऱ्या काही वस्तू कोणत्या असाही प्रश्न पडू शकेल. यातील शब्दसंपदा ही वाचन